कोकण परिक्षेत्रातील 18 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

सिंधुदुर्गातील कणकवली सह 4 पोलिस निरीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोकण परिक्षेत्रातील 18 पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या असून त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4 पोलीस ठाणे प्रभारींचा समावेश आहे. कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव , देवगडचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव, वैभववाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली करण्यात आली असून रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, मारुती जगताप, प्रदीप पोवार, सुरेश गावित यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील सुधीर संखे यांची रायगड जिल्ह्यात , पालघर जिल्ह्यातील सुरेश कदम यांची ठाणे ग्रामीण, रायगड जिल्ह्यातील केरुभाऊ कोल्हे, राजेंद्र तेंडुलकर, बाळा कुंभार, प्रमोद बाबर यांची ठाणे ग्रामीण मध्ये बदली करण्यात आली आहे. ठाणे ग्रामीण मधील आनंद पराड, प्रसाद पांढरे, रणवीर बयस, रमेश तडवी यांची पालघर आणि रायगड जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

error: Content is protected !!