२२ जानेवारीला वैभववाडीत अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
वैभववाडी (प्रतिनिधी) :वैभववाडीत श्री.दत्त देवस्थान कमिटी बाजारपेठ वैभववाडी यांच्या वतीने सोमवारी २२-०१-२०२४ रोजी श्री.दत्त मंदिर वैभववाडी या ठिकाणी अयोध्येत होणाऱ्या श्री.रामलल्ला प्राण -प्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ ते ९ या वेळेत श्री.प्रभू रामचंद्र यांची पाद्यपूजा संपन्न होणार आहे त्यानंतर ९ ते १० या वेळेत श्री.दत्त प्रासादिक भजन मंडळाचे भजन, सकाळी १० ते ११ या वेळेत गोखले सर यांचे प्रवचन त्यानंतर दुपारी ११ ते १२ यावेळी श्री.प्रभू रामचंद्रांच्या जयघोषात पालखी सोहळा व नंतर महाप्रसाद व सायंकाळी महिला वर्गासाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केला आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुवर्ण मंगल कार्यालयात खुल्या रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. वैभववाडी बाजारपेठेत दुतर्फा लावलेले भगवे झेंडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. रामलल्ला प्राण -प्रतिष्ठा दिनासाठी वैभववाडी शहर सज्ज झाले आहे.












