अयोध्या येथे होणाऱ्या श्री राम मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्या निमित्त आयोजन
चौके (अमोल गोसावी) : अयोध्या येथे होणाऱ्या श्री रामलल्ला मुर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्या निमित्त काल शनिवारी धामापूर मोगरणे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि श्री देवी भवानी मंदिर व परीसराची श्रमदानातून साफसफाई करण्यात आली. यावेळी सरपंच सौ मानसी परब, उपसरपंच रमेश निवतकर, सदस्य प्रशांत गावडे, अस्मिता फोपळे, सामाजिक कार्यकर्ते अविनाश निकम, बाळकृष्ण निकम, राघो फोपळे, संदिप फोपळे, विजय निकम, स्वप्नील नाईक, सौ. हर्षदा सडवेलकर, रंजना निकम, सौ राखी फोपळे, वैशाली गावडे , तात्या फोपळे आणि मोगरणे ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
यावेळी आरोग्य विभागाचे समुदाय आरोग्य अधिकारी दिव्या शेवडे, आरोग्य सेवक गणेश जाधव, आरोग्य सेविका माया इन्सुलकर, गौरी कसालकर यांनी उपस्थितीत राहून नागरीकांची आरोग्य तपासणी केली.
















