कट्टा भंडारी समाजातर्फे आंबेरी येथे आज मूर्तिकार बांधवांचा सत्कार

चौके (अमोल गोसावी) : कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ कट्टा संलग्न आंबेरी भंडारी समाज संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारी समाजातील गणेश मूर्तिकार आणि कुटुंबीय तसेच समाजातील वैदू यांचा सन्मान सोहळा आज रविवार दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी दुपारी ठीक 3 वाजता मालवण तालुक्यातील आंबेरी जिल्हा परिषद केंद्र शाळा नं. 1 सकलेश्वर मंदिराजवळ आंबेरी येथे होणार आहे. तरी भंडारी समाजातील सर्व समाज बांधव, मूर्तिकार यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!