समर्थ आश्रमात ध्वजारोहणाची संधी हा आयुष्यातील मोठा क्षण – सुनिल पाटिल

आश्रमातील बांधवांची सेवा करणारे कार्यकर्ते हे खरे सैनिक आहेत – किरण अरोलकर

जीवन आनंद संस्थेच्या आश्रमांत मान्यवरांच्या हस्ते राष्ट्र ध्वजारोहन

आश्रमातील बांधवांच्या सहभागातून ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्थेच्या महाराष्ट्र आणि गोव्यातील आश्रमांत ७५ वा प्रजासत्ताक दिन मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण होवून उत्साहात संपन्न झाला. विरारफाटा येथील समर्थ आश्रमात किरण आरोलकर व सुनिल पाटिल यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. यावेळी सुनील पाटिल यांनी समर्थ आश्रमात ध्वजारोहणची संधी हा आयुष्यातील मोठा क्षण असल्याचे प्रतिपादन केले. तर निराधार बांधवांची सेवा करणारे आश्रमातील कार्यकर्ते हे खरे सैनिक असल्याचे किरण अरोलकर यांनी म्हटले.

यावेळी सुनिल पाटील, स्मिता पाटील, दत्तात्रय पाटील, प्रसाद गावडे, संस्थेचे खजिनदार रामचंद्र अडसुळे , स्टाफ कार्यकर्ते भाईदास माळी, सुनिता भंडारी, दिपाली माळी, गोविंद मार्गी, शिवानी शेंगाळे, हेमलता पवार, मीना पटेल, चंदा छेत्री व आश्रमचे सर्व बांधव उपस्थित होते. किरण आरोलकर व सुनील पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देवून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व पटवून देत भाषण केले. सूत्रसंचलन दिपाली माळी यांनी तर शिवानी शेंगाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी आई भवानी मित्र परिवार कडून समर्थ आश्रमातील बांधवांसाठी नाश्त्याचे आयोजन करण्यात आले होते.सुनील पाटील आणि सौ. स्मिता सुनील पाटील यांनी आश्रममधील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ केला.

राजन बोभाटे असिस्टंट गव्हर्नर, रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि ॲड प्रणय तेली यांचे हस्ते संविता आश्रमात (पणदूर-कुडाळ) ध्वजारोहण झाले.जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब ,सर्व बांधव आणि स्टाफ उपस्थीत होते ओपा खांडेपार फोंडा गोवा येथील माँ आसरोघर आश्रम मधे सम्राट क्लबचे अमोल बेटकीकर यांचे शुभहस्ते ध्वजारोहण झाले. पुष्पा गावकर, आश्रमचे बांधव, कार्यकर्ते संदिप राणे, कमलेश मोरे व विश्वस्त किसन चौरे यांचे उपस्थीत कार्यक्रम संपन्न झाला.

error: Content is protected !!