आपली एकी- सलोखा आणि कार्य मंडळाच्या स्नेहसोहळ्यादिनी सर्वांसाठी भूषणावह — सचिन गोसावी.
फोंडाघाट (प्रतिनिधी) : आजवर गावाकडे स्नेहमेळावा उत्साहात संपन्न होतो,असे ऐकून होतो. मात्र आजची उपस्थिती पाहता एका वाडी चे स्नेहमिलन मुंबईच्या प्रशस्त हॉलमध्ये पाहून ” माका बरा वाटला ” या ज्ञाती बांधवांसाठी माझे सदैव सहकार्य राहील,असे कौतुकोद्गार माजी महापौर दत्ताजी साळवी यांनी काढताना, शुभेच्छा दिल्या.
फोंडाघाट गांगोवाडी उत्कर्ष मंडळाचा स्नेहमेळावा नुकताच मुंबई येथे पार पडला.अध्यक्षस्थानी मधुसूदन पाताडे होते. यावेळी महापौरांचे, गायत्री माळकर यांनी औक्षण करून स्वागत केले. प्रमुख मान्यवरांचे हस्ते सल्लागार हरिभाऊ बागवे, खजिनदार प्रकाश बागवे, श्रावणी बागवे, नामदेव लाड उभयता, आकाराम दळवी, शरद भालेकर यांचा विशेष योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन जनार्दन चव्हाण यांनी केले.
आपल्या प्रास्ताविकामध्ये जयवंत सावंत यांनी मंडळाच्या सामाजिक- सांस्कृतिक- आरोग्य विषयक कार्याची माहिती दिली. प्रत्येक सदस्यांनी मंडळ एकसंघ राखण्यासाठी होणाऱ्या बैठकींना उपस्थित राहणे काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले.नामदेव लाड,सतीश गुरव ,संतोष सावंत, उत्तम गुरव, अनंत घाटगे, मधुसूदन भालेकर, सचिन गोसावी, मधुसूदन पाताडे यांनी आपल्या भावना बोलून दाखविताना, मंडळा प्रति आस्था ठेवून, आपापल्या परीने प्रत्येकाने काम करावे, ज्यामुळे ८० वर्षाचे आपले मंडळ उत्कर्षाप्रद जाईल असे सांगितले.
दुसऱ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांचा हळदीकुंकू उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यानंतर वाडीतील लहान युवा- युवती आणि मुलांनी- कलाकारांनी आपली कला सादर करून रसिक न्याती बंधू- भगिनींना मंत्रमुग्ध केले.या स्नेहमेळाव्याला फोंडाघाट मुंबईमधील सुमारे ३५० कुटुंबीयांनी सहभाग घेऊन मेळावा परिश्रमपूर्वक यशस्वी केला…












