सुवर्ण महोत्सवी राज्य ज्यूदो स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात संपन्न*

स्वसंरक्षणासह खेळ शिकवणार्‍या ज्यूदो संघटनेच्या पाठीमागे राज्य शासन सहकार्यासाठी उभे राहील – देवेंद्र फडणवीस

नागपूर (प्रतिनिधी) : खंबीर मानसिकता याबरोबरच शारीरिक सुदृढतेची शिकवण देणार्‍या ज्यूदो खेळाच्या संघटनेस सर्वतोपरी मदतीसाठी राज्य शासन नक्कीच पाठीशी राहील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केले. आज सुवर्ण महोत्सवी राज्य ज्यूदो स्पर्धेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. दिनांक 04 फेब्रुवारीपर्यन्त चालणार्‍या या स्पर्धा मानकापुर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजिल्या आहेत.

फडणवीस पुढे म्हणाले की, राज्य ज्यूदो संघटनेनी ज्या जिल्ह्यांमध्ये ज्यूदोच्या मॅटस आणि खेळण्यासाठी जागा नाही त्या जिल्हयांची नावे कळवावीत तेथेही जिल्हा विकास आराखड्यातून मॅटससाठी आर्थिक मदत आणि जागा मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. यावेळी राज्यातील खेळाडूंनी दाखवलेल्या ज्यूदो आणि स्वसंरक्षण याच्या प्रात्यक्षिकांचे कौतुक करत फडणवीस म्हणाले की या खेळातून नैतिकतेचे धडे खेळाडूंना दिले जात असल्याने राज्यातील सर्व कुमार आणि युवक-युवतींनी या खेळाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. खेलो इंडियाच्या माध्यमातून घेतलेल्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात प्रथम आले असल्याचे सांगत त्यांनी खेळाडूंना अधिक चांगल्या दर्जाच्या साधनसुविधा शासन उपलब्ध करून देत आहे याच बरोबर नामांकित स्पर्धांमधून नैपुण्यप्राप्त खेळाडूंच्या बक्षिसांची रक्कमही एक कोटी रुपयांपर्यंत नेली आहे असे त्यांनी संगितले. मानकापुर क्रीडा संकुलासाठी शासनाने येथे सुधारणांचा प्रसाव मंजूर करून 700 कोटी रूपये राखीव ठेवल्याचे संगितले. ते म्हणाले की या ठिकाणी नागपूर ज्यूदोच्या सरावासाठी आधुनिक साहित्यांसह जागा उपलब्ध करून दिली जाईल.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित पुण्याचे प्रसिद्ध उद्योगपती आणि कार्यक्रमाचे विशेष अतिथी पुनित बालन यांनी संगितले की, व्यवसायात नफ्यापोटी मिळणार्‍या एकूण रकमेतील 30 टक्के रक्कम शासनाच्या करांसाठी, 40 टक्के रक्कम स्वत:साठी आणि 30 टक्के रक्कम समाजासाठी खर्च करण्याचा सल्ला त्यांच्या मातोश्रीनी दिला असून आम्ही राज्यातील खेळ आणि खेळाडूंसाठी त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून दरवर्षी 50 कोटी रुपयांची रक्कम राखीव ठेवत असल्याचे त्यांनी संगितले. कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ज्यूदो स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
महासचिव शैलेश टिळक यांनी प्रास्ताविकात राज्यातील ज्यूदोच्या प्रवासात ज्यूदोचे प्रणेते कै. खानीवाले सर आणि अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची महती सांगून एकंदर खेळ आणि विशेषत्वाने ज्यूदो याकडे शासनाने अधिकच्या सहकार्याची गरज विषद केली. ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष अॅड. धनंजय भोंसले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर क्रीडा व युवक सेवा संचलंनालयाच्या नागपूर विभागाचे क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे उपाध्यक्ष राजकुमार पुनकर, डॉ पुरषोत्तम चौधरी, यतीश बंगेरा, तांत्रिक समितीचे अध्यक्ष रविंद्र पाटील, कोषाध्यक्ष रविंद्र मेटकर, सभासद विकास पाटील, डॉ सतीश पहाडे तसेच कुणाल टिळक उपस्थित होते. स्पर्धांचे प्रमुख योगेश धाडवे यासह रविंद्र पाटील, शेलेश देशपांडे आणि सुरेश कनोजिया यांचा स्पर्धेचे मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तांत्रिक समितीचे सचिव दत्ता आफळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मनीषा देशमुख-महात्मे यांनी केले.
1100 खेळाडूंचा सहभागराज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर यांसह बीड, गोंदिया नंदुरबार, सिंधुदुर्ग अशा विविध जिल्ह्यातील 33 जिल्ह्यातील 1100 खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. या स्पर्धेसाठी बँक ऑफ महाराष्ट्र, कॉसमॉस बँक, लोकमान्य क्रेडिट सोसायटी आणि अॅमनोरा यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय पंचांसह राष्ट्रीय व राज्यातील तज्ञ 75 पंचांची नियुक्ती करण्यात आलेली असून भारतात प्रथमच नागपूर येथील या स्पर्धेमध्ये चार मॅट एरिया लावण्यात आलेले आहेत.

दरम्यान आज झालेल्या सामन्यांमध्ये कोल्हापूरच्या सृष्टी नगराळे हिने 44 किलोखालील वजनगटात मुंबईच्या साक्षी वैश्य हिचा दोन मिनिटामध्ये इप्पोन गुण घेऊन पराभव केला. तर 55 किलोखालील गटामध्ये परभणीच्या ओम हिंगमिरे याने केवळ 32 सेकंदात कोल्हापूरच्या अनमोल पालकरला आस्मान दाखवले. सर्वात बहारदार आणि कमी वेळेतील विजय 57 किलोखालील गटाच्या क्रीडा प्रबोधिनीच्या समृद्धी पाटील हिने पुण्याच्या गांधाली शिधयेवर ओ-गोशी या डावावर नाममात्र 13 सेकंदात इप्पोन गुणाने विजय मिळवला. तर मुंबईच्या आयुष फालके याने 73 किलोखाली वजनगटात जालन्याच्या हर्ष शिंपीवर ससाईत्सुरी कोमी आशी या डावाने 35 सेकंदात पराभूत केले.

आजच्या दिवसातील ज्युनियर्स गट सामन्यांचे निकाल पुढीलप्रमाणे-

44 किलोखालील मुली
सुवर्ण- सृष्टी नगराळे, कोल्हापूर
रौप्य -साक्षी वैश्य, मुंबई
कांस्य-जागृती पवार, वर्धा
कांस्य-स्वाति जगताप, धुळे

48 किलोखालील मुली
सुवर्ण-भक्ति भोसले, ठाणे
रौप्य -आकांक्षा शिंदे, नाशिक
कांस्य-साक्षी मगदुम, क्रीडा प्रबोधिनी
कांस्य- वीणा गंधवाले, कोल्हापूर

52 किलोखालील मुली
सुवर्ण-वैष्णवी खलाणे, नाशिक
रौप्य -वैष्णवी पाटील, क्रीडा प्रबोधिनी
कांस्य-दिशा खरे, गोंदिया
कांस्य-पियुषा दामले, पीडिजेए

57 किलोखालील मुली
सुवर्ण-समृद्धी पाटील, क्रीडा प्रबोधिनी
रौप्य -गंधाली शिधये, पिजेए
कांस्य-जॅस्मिन अंसारी, मुंबई
कांस्य-सोनाली होडशीळ, अहमदनगर

63 किलोखालील मुली
सुवर्ण-गायत्री निकम,सांगली
रौप्य -अश्विनी सोलंके, क्रीडा प्रबोधिनी
कांस्य-अंकिता जाधव, कोल्हापूर
कांस्य-यज्ञवी सुतार, पीडिजेए

70 किलोखालील मुली
सुवर्ण- समीक्षा शेलार, क्रीडा प्रबोधिनी
रौप्य -भूमी कोरडे, मुंबई
कांस्य-अफिफा सईद, पिजेए
कांस्य-आरती आधाणे, छत्रपती संभाजीनगर

78 किलोखालील मुली
सुवर्ण-संस्कृती पाटील, क्रीडा प्रबोधिनी
रौप्य -तनुजा वाघ, नाशिक
कांस्य-सायली, ठाणे
कांस्य-श्रुती कुचेकर, सातारा

78 किलोवरील मुली
सुवर्ण- ऋतुजा खाडे, कोल्हापूर
रौप्य -नारायणी इंगळे, अमरावती 55 किलोखालील मुले
सुवर्ण-ओम हिंगमिरे, परभणी
रौप्य -अनमोल पालकर, कोल्हापूर
कांस्य-राजन गुप्ता, मुंबई
कांस्य-पीयूष शिंगारे, अहमदनगर

60 किलोखालील मुले
सुवर्ण-प्रणित गोडसे, क्रीडा प्रबोधिनी
रौप्य -अविनाश डांगरे, नागपूर
कांस्य-रीतीश बंगेरा, ठाणे
कांस्य-सनी रणमाळे, कोल्हापूर

66 किलोखालील मुले
सुवर्ण-होरमझद जिजिना, मुंबई
रौप्य -अथर्व चव्हाण, पीडिजेए
कांस्य-धनंजय खैरणार, धुळे
कांस्य-सारंग शहाणे, अमरावती

73 किलोखालील मुले
सुवर्ण-आयुष फालके, मुंबई
रौप्य -हर्ष शिंपी, जळगांव
कांस्य-अभिजीत इजनकर नागपूर
कांस्य-रोहित चव्हाण, नाशिक

81 किलोखालील मुले
सुवर्ण-प्रदीप गायकवाड, सोलापूर
रौप्य -एस. बालाजी, पीडिजेए
कांस्य-आकीब शेख, मुंबई
कांस्य-स्वराज लाड, क्रीडा प्रबोधिनी

90 किलोखालील मुले
सुवर्ण-यश कांबळे, पीडिजेए
रौप्य -पृथ्वीराज जाधव, क्रीडा प्रबोधिनी
कांस्य-आर्यन मल्होत्रा, मुंबई
कांस्य-हर्षवर्धन पाटील, कोल्हापूर

100 किलोखालील मुले
सुवर्ण-गणेश मसलकर, बीड
रौप्य -पीयूष मेश्राम, अमरावती
कांस्य-फहादशेख, मुंबई
कांस्य-ऋतिक भोंडवे, पीडिजेए

100 किलोवरील मुले
सुवर्ण-आदित्य परब, पीडिजेए
रौप्य -मंनवर्धन पाटील, ठाणे
कांस्य-वीर खोना, मुंबई

error: Content is protected !!