स्वराज्य योद्धा ! ठाकरेंच्या स्वागताचे अतुल रावराणेंचे बॅनर ठरताहेत लक्षवेधी

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनसंवाद यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग रत्नागिरी दौऱ्यावर 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी येत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात लावलेल्या बॅनरवरील स्वराज्य रक्षक ही टॅगलाईन सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. एकीकडे कुटील नीतीने फोडलेला पक्ष, साथ सोडून जाणारे खासदार आमदार असे चित्र असतानाही एकला लढो रे म्हणत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. राज्यात सुरू असलेल्या एकंदर राजकीय परिस्थितीवर मात करण्यासाठी जनतेचे सुराज्य पुन्हा निर्माण करण्यासाठी स्वराज्य रक्षकाची भूमिकाच उद्धव ठाकरे निभावत असल्याचा संदेश अतुल रावराणे यांनी ठाकरेंच्या स्वागताच्या बॅनर मधून दिला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

error: Content is protected !!