चौके (प्रतिनिधी) : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कट्टा येथील MKCL चे मान्यता प्राप्त केंद्र असलेले गेली 14 वर्षे ची परंपरा असलेल्या स्मिता कंप्युटर एज्युकेशन कट्टा तर्फे सारथी या कोर्स विषयी हा कोर्स शिकत असलेल्या कुमारी वैभवी वामन लाड या लाभार्थीने मालवण तालुक्यातील गोळवण- कुमामे -डीकवल या ग्रामपंचायती मध्ये उपस्थित ग्रामस्थांना दिली
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या सेवाभावी संस्थेमार्फत मराठा व कुणबी मराठा समजासाठी UPSC परीक्षा मार्गदर्शन, MPSC परीक्षा मार्गदर्शन, तसेच इतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, एम.फील करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप, सारथी कौशल्य् विकास कार्यक्रम, दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना परीक्षा, कृषी मार्फत येणाऱ्या योजना इ. वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी सारथी या सेवाभावी संस्थेमार्फत आर्थिक साहाय्य् दिले जाते. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तीमत्त्व् विकास व संगणक कौशल्य् विकास प्रशिक्षण कार्यक्रम, MKCL मार्फत स्मिता कंप्युटर एज्युकेशनला अधिकृतपणे देण्यात आलेले आहेत.
यामध्ये CSMS–DEEP Diploma नावाचा कोर्स असून या कोर्समध्ये चार कोर्स जे भविष्य् घडविण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना खुप उपयुक्त आहेत. पहिले दोन कोर्स compulsory आहेत. यामध्ये पहिले Module हे English Communication & Soft Skill. म्हणजेच संवाद भाषा कौशल्य्… दूसरे Module Basic Information & Tech. Skills. शिवाय आणखी दोन कोर्स आपण दिलेल्या अकरा कोर्समधून निवडू शकतो. त्यातील सध्या कार्पोरेट ऑफीस मध्ये मुंबई, पुणे सारख्या भागात अधिकृतेने चालणारा Accounting & Advance Excel हे कोर्स निवडलेले आहेत. तसेच इतरही कोर्स विद्यार्थी यामध्ये निवडू शकतात.
यात प्रथम विद्यार्थ्यांना मिळालेला English Communication & Soft Skill मध्ये विद्यार्थ्यांना English Grammar, English words, Story Writing तसेच Interview ची तयारी करायची अशी विविध माहिती या पहिल्या कोर्स मध्ये मिळते. दुसऱ्या कोर्स मध्ये कंप्युटरचे बेसिक ज्ञान, वेगवेगळी टूल्स विविध स्किल्स ची माहिती विद्यार्थ्यांना समजते..
CSMS-DEEP कोर्स ६ महिन्याचा आहे. हा कालावधी विद्यार्थ्यांना खूप वाटतो परंतु जेव्हा हा कोर्स सूरू होतो तेव्हा त्या कोर्सची विद्यार्थ्यांना करियरच्या द़ष्टीने गरजेचे वाटू लागते.
या कोर्सविषयी प्रवेश प्रक्रियेसंबंधी माहिती प्रथम म्हणजे हा कोर्स पूर्णत: मोफत आहे. या कोर्सचा कालावधी ६ महिने असून या कोर्समध्ये चार कोर्स तुम्हाला मोफत मिळतात. या कोर्सची शैक्षणिक पात्रता किमान १० वी पास असावी. १८ ते ४५ या वयोगटातील मराठा समाजातील कोणीही प्रवेश घेऊ शकतो. त्यासाठी लागणारे कागदपत्रे – आधार कार्ड, फोटो, दहावी गुणपत्रक, जन्मदाखला, वय अधिवास इ. कागदपत्रे लागणार आहेत. या कोर्ससाठी सारथी या सेवाभावी संस्थेने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांने रु. २०००/- घेण्याचे सुरक्षाठेव(fixed deposit) म्हणून सुचित केले आहे. हे २०००/- चे सुरक्षा ठेव विद्यार्थ्याने चारही कोर्स पुर्ण केल्यावर परत मिळणार आहेत. विद्यार्थ्याने चारही Module पूर्ण केल्यावर प्रत्येक Module चे एक स्वतंत्र प्रमाणपत्र अशी चार कोर्सची चार प्रमाणपत्र आणि Diploma चे एक स्वतंत्र प्रमाणपत्र त्या विद्यार्थ्यांस मिळणार आहे.
तरी मराठा समाजातील विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, युवक-युवतींना सारथी या सेवाभावी संस्थेकडून देण्यात आलेल्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन स्मिता कंप्युटर एज्युकेशनच्या वतीने यावेळी करण्यात आले आहे.













