राणे कुटुंबाने सिंधुदुर्ग लुटला ; अतुल रावराणेंनी खरमरीत टीका

कणकवली (प्रतिनिधी) : खोके सरकारचे खोटे जुमले उभे करून जनतेची दिशाभूल करण्याचे उद्योग आपण पाहिले आहेत.टिल्या आमदार उद्धव ठाकरेंची सभा उधळण्याची भाषा करत होते. ज्यांना स्वतःचा पक्ष विसर्जित करावा लागला, ज्यांनी राम गडकरींचा पुतळा तोडण्यासाठी 5 लाख दिले तो टिल्या आमदार केवळ ठेकेदारांना कमिशन साठी लुटत आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी उदार मनाने नारायण राणेंच्या खाजगी मेडिकल कॉलेज ला शासकीय परवानगी दिली.मात्र त्यानंतर स्वार्थी राणे परिवाराने ठाकरेंवर गरळ ओकली.स्वतःचा आर्थिक विकास राणे कुटुंबाने केला. मिठबाव मध्ये होणारा मोठा पर्यटन प्रकल्प राणेंनी बंद पाडला. अशी खरमरीत टीका शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी कणकवली येथील जनसंवाद यात्रेच्या सभेत केली.खासदार विनायक राऊत यांच्यासमोर अद्याप उमेदवार विरोधकांना देत आला नाहीय.यातच आमचा विजय आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत अडीच लाख मतांनी विनायक राऊत विजयी होतील असा विश्वासही अतुल रावराणे यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!