वैभव नाईक यांची राणे पितापुत्रावर टीका
कणकवली (प्रतिनिधी) : आज उद्धव ठाकरे राज्यात आणि राज्याबाहेरही दमनशक्तीबरोबर लढत आहेत.तुमच्या वडिलांची दादागिरी मोडली, तुमची कुठे ठेवणार ? असा सवाल करत ठाकरेंची सभा उधळण्याची भाषा करणाऱ्यांचा आमदार वैभव नाईक यांनी समाचार घेतला. गद्दारी करणार्यांना जनतेने कायम मातीत गाडले आहे. ही लढाई मराठी माणूस विरुद्ध गुजराती अशी आहे.मराठी माणसांच्या सोबत शिवसेना आहे तर गुजराती लोकांना भाजपाची शक्ती आहे.देशात ईडी चा ससेमिरा भाजपा लावत असतानाही उद्धव ठाकरे लढा देत आहेत. आपण येत्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विनायक राऊत याना निवडून देऊया असे आवाहनही आमदार वैभव नाईक यांनी केली.












