सिंधुदुर्गात टिनपाट राणे घराणेशाही ; भाजपा गुंडांपुढे हतबल
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काढले वाभाडे
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील भगवे वादळ दिल्लीच्या दिशेने निघाले.गुंडांच्या लाचारांच्या नामर्दांच्या देशा ही आपल्या महाराष्ट्र ची ओळख नसून राकट देशा अशी ओळख आहे.पंतप्रधान सिंधुदुर्गात येऊन गेले पण सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेले नाही.छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव मंदिरात नतमस्तक होतील असे वाटले होते.त्यांनी सिंधुदुर्ग ला दिले काहीच नाही पण जिल्ह्यात ला पाणबुडी प्रकल्प सुद्धा गुजरातला घेऊन गेले.मोदींचे गुजरात प्रेम मान्य पण महाराष्ट्रावर अन्याय का करता ? गुजरात कच्छ भूकंपावेळी माझ्यासह सुरेश जैन मदतीला गेले होते. महाराष्ट्र लुबाडत असाल तर आम्ही तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही.ह्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राजापूर ची पवित्र गंगा आहे तशीच दुर्दैवाने गटारगंगा असल्याचे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणे पितापुत्रावर टीका केली.आज सभेला मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने आहेत.आमचे हिंदुत्व चूल पेटवणारे तर भाजपाचे घर पेटवणारे असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली. जेव्हा अटल वाजपेयी तुम्हाला राजकारणातून बाजूला करत होते तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते म्हणून तुम्ही वाचलात.आणि आज मलाच त्याच बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला संपवायला निघालात ? जर तुमच्यात हिम्मत असेल, तुम्ही मर्द असाल तर तुमचे घरगडी असलेले ईडी सीबीआय पोलीस बाजूला ठेवून या मैदानात.शिवसेना नाव चोरलात, धनुष्यबाण ला छेद केलात. तरीही तुम्ही उद्धव ठाकरे नजरेत खुपतो ? तुमची सत्ता गेली की हीच ताकद तुमच्यासमोर कशी येते बघा. भाजपा आमदार गायकवाड नवं पोलीस ठाण्यात गोळीबार केला.गोळीबार केल्याचे स्टेटमेंट स्वतः गायकवाड ने केले आहे.गायकवाड याचे करोडो रुपये मिंधेकडे आहेत.त्याची चौकशी कोण करणार ? कुठे आहात ? आता महाराष्ट्र ची ओळख गुंडांच्या देशा अशी भाजपावाले करताहेत.बाळासाहेबांनी नारायण राणेंची शिवसेनेतून ढुंगणावर लाथ मारून हकालपट्टी केली. भाजपा ची ढाल म्हणून बाळासाहेबांची शिवसेना उभी होती. आज त्याच शिवसेनेला संपवायला निघाले आहेत. घराणेशाही नको म्हणणाऱ्या भाजपाला मग राणेंची टिनपाट घराणेशाही कशी चालते ? चीन घुसखोरी करतोय, पाकव्याप्त काश्मीर आपण घेऊ शकत नाही. आणि जनतेला श्रीरामा च्या नावावर गुंग केले जात आहे. 80 कोटी लोकांना मोफत अन्न देत म्हणता मग बेरोजगारी कोणाची कमी केलीत ? प्रश्न विचारणाऱ्या ला देशद्रोही म्हणता ? आज भाजपा देश हुकूमशाही च्या दिशेने नेतोय. ही हुकूमशाही ठेवणे गरजेचे. तुमच्या पिढीचे भविष्य हुकूमशाही च्या ताब्यात द्यायची ईच्छा आहे काय ? तुम्हाला हुकूमशहा हवाय काय असा सवाल उद्धव यांनी सभेत केला. अब मी बार भाजपा तडीपार चा नाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. सत्तेचा अमरपट्टा कोणाकडेही नसतो. जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा सीबीआय ईडी इन्कम टॅक्स, पोलीस ही यंत्रणा आमच्याकडे येईल. दोन पावले मागे येत औरंगजेबाशी तह करताना छत्रपतींनी त्यानंतर भगव्याची प्रतिष्ठापना केली. आज पुन्हा महाराष्ट्रात आणि देशांत भगव्याची प्रतिष्ठापना करायची वेळ आली आहे. लढायला मी तयार आहे . तुम्ही साथ देणार काय ? हा गोवर्धन तुमच्या साथीने उचलणार असल्याचेही ठाकरे म्हणाले.












