श्री गणेश दर्शनासह महाप्रसाद साठी भाविकांनी उपस्थित राहावे
मंडळाचे अध्यक्ष संजय कामतेकर यांचे आवाहन
कणकवली (प्रतिनिधी) : माघी गणेश जयंतीनिमित्त 13 फेब्रुवारी रोजी श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ कणकवली च्या वतीने उपजिल्हा रुग्णालय कणकवली समोर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून श्री गणेश दर्शनासह महाप्रसादाचा उपस्थित राहून भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक संजय कामतेकर यांनी केले आहे. माघी गणेश जयंतीनिमित्त 12 फेब्रुवारी रोजी श्रीगणेशमूर्तीचे आगमन होणार असून 13 फेब्रुवारी रोजी गणेशमूर्ती ची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. सकाळी 8 वाजता सत्यनारायण महापूजा होणार आहे. सकाळी 10 : 30 वाजता महाआरती होणार असून सकाळी 11 वाजल्यापासून तिर्थप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. दुपारी 1 ते 3 वाजण्याच्या दरम्यान महाप्रसाद वाटप असून दुपारी 12 ते 1 श्री गांगेश्वर अनभवानी भजन मंडळ डामरे यांचे, दुपारी 1 ते 2 श्री भालचंद्र प्रासादिक भजन मंडळ हळवल, दुपारी 2 ते 3 श्री कोटेश्वर भजन मंडळ हरकूळ बुद्रुक, दुपारी साडेतीन ते साडेचार कोटेश्वर नवतरुण भजन मंडळ, साडेचार ते साडेपाच श्री लिंगेश्वर भजन मंडळ, साडेपाच ते साडेसहा श्री मेजारेश्वर भजन मंडळ नागवे, साडेसहा ते साडेसात श्री राधाकृष्ण भजन मंडळ जानवली, साडेसात ते साडेआठ श्रीदत्त भजन मंडळ गावराई सुकळवाड यांची भजने सादर होणार आहेत. रात्री साडेआठ वाजता महाआरती होणार असून रात्री साडेनऊ वाजता बुवा साची मुळम विरुद्ध दीपा कुळये यांचा ट्वेन्टी ट्वेन्टी डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे. बुधवारी 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता सिंधुगर्जना ढोलपथकाच्या तालावर श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.












