देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका मराठा समाज च्या वतीने देवगड येथे आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषात पार पडला या सोहळ्याचे ध्वजारोहण मिलिंद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आले.
यावेळी देवगड तालुका मराठा समाज अध्यक्ष संदीप साटम,उपाध्यक्ष मिलिंद माने,विनायक जोइल,महेश पाटोळे,सचिव केदार सावंत,सहसचिव शशांक साटम,खजिनदार अविनाश सावंत ,कार्यक्रम प्रमुख बंटी कदम,अमित साटम,नगरसेविका प्रणाली माने,नगरसेवक शरद ठुकरुल सदस्य प्रदीप सावंत अन्य सदस्य मराठा समाज बांधव उपस्थित होते.
या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स.८.३० वा छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन,अभिषेक महाआरती त्यानंतर आकर्षक रथातून वेशभूषेतील शिवराय व अन्य यांच्या समवेत ढोलताशांच्या गजरात भव्य रथ व मोटरसायकल सह देवगड कॉलेजनाका ते देवगड किल्ला रॅली काढण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गजरात देवगड किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन करण्यात आले.देवगड चे उद्योगपती नंदकुमार घाटे,प्रकाश गोगटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या निमित्ताने सुशील पंडित यांनी शिवाजी महाराजांवर बहारदार पोवाडा सादर केला.देवगड कॉलेज नाका येथे पार पडलेल्या शिवजयंती उत्सवात गडकिल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली होती.तसेच शिवकालीन नाण्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.











