मालवण (प्रतिनिधी) : ज्या मालवण तालुक्यातील मालडी बंदरातून छत्रपती शिवाजी महाराजांनी आली पहिली आरमारी स्वारी कर्नाटकातील बसनूरवर केली होती, त्या मालडी बंदर येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सिंधुदुर्ग किल्ला हे शिवरायांचे आरमारी केंद्र होते. या किल्ल्यापासून जवळच असणाऱ्या मालडी येथून शिवरायांनी ८ फेब्रुवारी, १६६५ रोजी ३ मोठी लढाऊ गलबते व ८५ जहाजे एवढ्या आरमारी सामग्रीनिशी आपली पहिली आरमारी स्वारी केली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने हे मालडी बंदर पावन झाले होते. त्याच बंदरावर आज येथे शिवजयंती उत्सव उत्साहात पार पडला. यावेळी इतिहासाला उजाळा देण्यात आला.
छत्रपतींच्या पहिल्या आरमारी स्वारीचा साक्षीदार असणाऱ्या मालडी बंदर येथे शिवजयंती उत्साहात साजरी











