१३ फेब्रुवारी जंत नाशक दिनाच्या निमित्ताने आरोग्य विभागाच्या वतीने वैभववाडीत जंत नाशक गोळ्यांचे वाटप

अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांना केले वाटप

वैभववाडी (प्रतिनिधी) : लहान मुलांमधील रक्तक्षयाचा आजार कमी करण्यासाठी जंतनाशक गोळी खाऊ घालण्याचा कार्यक्रम जिल्हा आरोग्य विभागाने हाती घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक ते 19 वर्षे वयोगटातील 1,38,493 मुले असून अंगणवाड्या शाळा महाविद्यालय या सर्वच ठिकाणी आज 13 फेब्रुवारी रोजी दुपारच्या जेवणानंतर जंतनाशक गोळी मुलांना खाऊ घातली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या पत्रकार परिषदेत जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.रमेश कर्तस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. त्या पार्श्वभूमीवर वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव‌ रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात जंत नाशक गोळ्यांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

जंतामुळे लहान मुलांमध्ये ॲनेमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार मळमळ, भूक मंदावणे, आतड्यावर सूज येणे आदी आजार डोके वर काढताना दिसत आहेत. त्यामुळे लहान मुलांना वर्षातून दोन वेळा जंतनाशक गोळी खाऊ देणे आवश्यक आहे. यासाठी शासनही आवश्यक ते प्रयत्न करत आहे. शासनाकडून वर्षभरात दोन वेळा जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाते. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात १३ फेब्रुवारी रोजी जंतनाशक गोळी वाटप केली आहे .असून जिल्ह्यातील १ ते १९ वयोगटातील १ लाख ३८ हजार ४९३ एवढ्या मुलांना या गोळ्या दिल्या जाणार आहेत. तर या दिवशी जी मुले गैरहजर राहणार त्यांना २० फेब्रुवारी रोजी ही गोळी दिली जाणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर, जेष्ठ शिक्षक एस.बी शिंदे,शालेय आरोग्य विभाग प्रमुख जे.एस.बोडेकर. आरोग्य विभाग कर्मचारी सायली जाधव विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!