फोंडाघाट विकास सेवा सोसायटी तर्फे कार्डधारकांना ‘आनंदाचा शिधा’ व साडी वाटप संपन्न !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने अयोध्येतील राममंदिर उद्घाटन सोहळा आणि महाराष्ट्राचे आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ अन् महिलांसाठी साडीवाटप उपक्रम राबवून “जनतेचे सरकार” असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस शिंदे सरकारच्या, महायुतीच्या सदैव पाठीशी राहील. असा विश्वास फोंडाघाट सरपंच सौ. संजना आग्रे यांनी व्यक्त केला.
अयोध्येमधील राम जन्मभूमीच्या निर्माण सोहळ्यानिमित्त आणि छत्रपती शिवरायांच्या ३५० व्या जयंती उत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाने रास्त धान्य दुकानातून अन्नसुरक्षा योजनेखाली आणि अंत्योदय कार्डधारकांना आनंदाचा शिधा तसेच फक्त अंत्योदय रेशन कार्डधारकांना महिलांसाठी साडी वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी करताना, फोंडाघाट विकास सेवा सोसायटीतर्फे संबंधित रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा आणि साडी वाटप मान्यवरांचे हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी सरपंच संजना आग्रे, उपसरपंच तन्वी मोदी, चेअरमन राजन नानचे, सुभाष सावंत, तलाठी एस.बी सावंत, संचालक ध्रुवबाळ गोसावी, लिपिक मिलिंद तावडे, अशोक तावडे, सरिता पाटकर, आर्या नांचे, लाभधारक कार्डधारक ग्रामस्थ उपस्थित होते. चेअरमन राजन नांनचे यांनी महायुती शासनाने गोरगरीब रेशन कार्डधारकांसाठी राबवीत असलेल्या योजना बद्दल समाधान व्यक्त करताना, शासनाचे आभार मानले.













