चिंदर ग्रंथालयास साहित्यिक सुरेश ठाकूर यांची अनोखी भेट..!

सत्तराव्या वाढदिनी दिली सत्तर पुस्तके भेट

आचरा (प्रतिनिधी) : कथामाला मालवण, जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरायात क्रियाशील, कोकण मराठी साहित्य परिषद मालवणचे अध्यक्ष, जेष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर गुरुजी यांचा काल गुरुवार 22 फेब्रुवारी रोजी 70 सत्तर वा वाढदिवस होता. यानिमित्त त्यांनी चिंदर गावात वाचन संस्कृती वृद्धीगत व्हावी, वाचक संख्या वाढावी या उदात्त हेतूने सत्तर पुस्तके श्री देवी सरस्वती वाचनालय आणि ग्रंथ संग्रहालय चिंदरला खजिनदार देवेंद्र हडकर यांच्या माध्यमातून भेट देण्यात आली. अशा प्रकारे आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा झाला. यावेळी उपाध्यक्ष संतोष पाताडे, कार्यकारिणी सदस्य- विवेक(राजू)परब, गोपाळ चिंदरकर, ग्रंथपाल नम्रता महंकाळ-पालकर, प्रकाश खोत, भालचंद्र गोलतकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!