खारेपाटण केंद्र शाळेचे वार्षिक स्नेह संमेल्लन संपन्न

फूड फेस्टिवल व स्कूल बस उद्घघाटन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने पालक भारावले

“खारेपाटण जि.प.केंद्र शाळा ही राज्यातील आदर्श शाळा “

खारेपाटण (प्रतिनिधी) : सद्याच्या स्पर्धेच्या युगात आपण बदलले पाहिजे. खारेपाटण केंद्र शाळा ही बदलत्या काळानुसार भविष्याच्या दिशेने पावले उचलणारी व वेगवेगळे उपक्रम राबवणारी जिल्ह्यातील एकमेव शाळा असून राज्यातील देखील आदर्श शाळा आहे. असे भावपूर्ण उदगार शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे यांनी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व शालेय विद्यार्थी पारितोषक बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलताना काढले.

सलग दोन दिवस संपन्न झालेल्या या कार्यक्रमास शिवसेना जिल्हा अध्यक्ष संजय आंग्रे,जिल्हा खजिनदार भास्कर राणे, युवा जिल्हा अध्यक्ष सुकांत वरुणकर,एम के सी एल जिल्हा समन्वयक प्रणय तेली, तालुका अध्यक्ष मंगेश गुरव, खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, ग्रा.पं.सदस्य तथा शा.व्य. समिती प्राधिकरण सदस्य गुरुप्रसाद शिंदे,माजी सरपंच रमाकांत राऊत, उपसरपंच इस्माईल मुकदाम, ग्रा.पं. सदस्य अस्ताली पवार, सामजिक कार्यकर्ते मधुकर गुरव, रफिक नाईक,लियाकत काझी, सुधील पारकर,आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्युज चॅनलचे संपादक राजन चव्हाण, विजय देसाई, नीखील गुरव, वीरेंद्र चीके, डॉ.प्रिया वडाम, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे संचालक भाऊ राणे,सुधीर कुबल, निवृत्त बँक अधिकारी संतोष रानडे, खारेपाटण हायस्कूल प्राचार्य संजय सानप,पर्यवेक्षक संतोष राऊत, खारेपाटण सोसायटी उपाध्यक्ष सुरेंद्र कोरगावकर, खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे प्रमुख उद्धव साबळे, शा.व्य.समिती अध्यक्ष प्राप्ती कट्टी,पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे, माता पालक संघ उपाध्यक्ष प्रियंका गुरव, केंद्रप्रमुख संजय पवार, गोपाळ जाधव, सुर्यवंशी, खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घघाटन संजय आंग्रे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या वतीने व पालक ग्रामस्थ आणि दानशूर व्यक्तीच्या सहकार्यातून शालेय विद्यार्थ्यासाठी घेण्यात आलेल्या स्कूल बसचे उद्घघाटन देखील संजय आंग्रे व सुकांत वरुणकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तर या कार्यक्रमाच्या अनुशंगाणे भरविण्यात आलेल्या विद्यार्थी आणि पालक यांच्या फूड फेस्टिव्हल तथा विविध स्टॉलचे उद्घघाटन खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. तसेच विद्यार्थी आणि महिला पालक यांनी काढलेल्या रंगावली दालनांचे उद्घघाटन देखील यावेळी मान्यवर यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी खारेपाटण केंद्र शाळेच्या वतीने खारेपाटण ग्रा.पं. सदस्य तथा शा.व्य.समिती सदस्य श्री गुरुप्रसाद शिंदे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय आंग्रे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी खारेपाटण हायस्कूलचे मुख्याद्यापक संजय सानप यांनी मनोगत व्यक्त करताना “या शाळेचे मुख्यद्यापक श्रावणकर सर व त्यांची संपूर्ण टीम गेली १० वर्षे शाळेच्या विकासासाठी अथक प्रयत्न करत असून आज गावातील एका जि.प.मराठी शाळेला एक उंच शिखरावर नेऊन ठेवले आहे. त्याची उंची कोणीच गाठू शकत नाहीं. हे सर्वश्रुत आहे. शाळांच्या गुणात्मक स्पर्धेत समित्यांचे निकाल काही येवोत. मात्र खारेपाटण केंद्र शाळा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्र राज्याला आदर्शवत व अभिमान वाटावा अशी शाळा आहे. हे सत्य कोणी नाकारू शकत नाही.” असे भावपूर्ण उदगार काढले. तर सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव यांनी देखील शाळेच्या स्नेहसमेलन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. व एक जिल्हा परिषद शाळा एवढ्या उच्च दर्जाचा नेटके नियोजन असलेला दिमखदार कार्यक्रम सादर करू शकते. याबद्दल शाळेचे कौतुक केले.

शाळेच्या वार्षिक स्नेसंमेलना निमीत्त शिशूविहार, अंगणवाडी व शालेय गट व खुला गट अशा विविध गटातील फॅन्सी ड्रेस स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, रेकॉर्ड डान्स स्पर्धा तसेच फूड फेस्टिवल स्टॉल स्पर्धा घेण्यात आल्या. यातील विजेत्या स्पर्धकांना पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र रोख पारितोषिक देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. याबरोबरच शालेय विद्यार्थी वार्षिक बक्षीस वितरण सोहळा देखील संपन्न झाला. यावेळी शालेय आदर्श विद्यार्थी म्हणून सर्वेश नाडगौड तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून ईरम सारंग यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले.तर कार्यक्रमाचे प्रास्तविक खारेपाटण केंद्र शाळेच्या शा.व्य. समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी केले.सर्वांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनी मानले. या कार्यक्रमाला खारेपाटण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य माता पालक संघ व पालक शिक्षक संघ सदस्य यांचे मोठे योगदान लाभले.

error: Content is protected !!