देव स्वाऱ्यांच्या व भाविकांच्या तिर्थस्नानाने कुणकेश्वर यात्राेत्सवाची सांगता

देवगड (प्रतिनिधी) : देवस्वा-यांच्या व भाविकांच्या पवित्र तिर्थस्नानाने कुणकेश्वर यात्रेची सांगता झाली. गेले तीन दिवस भाविकांनी यात्रेला उच्चांकी गर्दी केली होती.

शनिवारपासून सुरू झालेल्या यात्रेची सांगता तिस-या दिवशी पवित्र तीर्थस्नानाने झाली. यात्रेच्या तिस-या दिवशीही भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढला होता.कुणकेश्वर भेटीसाठी जिल्ह्यातून श्रीदेव लिंगेश्वर पावणाईृ असरोंडी मालवण, श्रीजयंती देवी पळसंब, श्री देव रवळनाथ वायंगणी या तीन देवस्वा-या आल्या होत्या.या देवस्वा-यांनी सोमवारी पहाटेपासुन समुद्रात तीर्थस्नानाला जाण्यास सुरूवात केली.देवस्वा-यांबरोबरच तिर्थस्नान करण्यासाठी लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती पहाटे तीन वाजल्यापासुन समुद्रकिना-यावर धार्मिक विधींना प्रारंभ झाला. देवस्वा-या व भाविकांच्या तीर्थस्नानावेळी समुद्रकिनारी सुरक्षा ठेवण्यात आली होती.आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलिस, स्वयंसेवक समुद्रकिनारी सज्ज होते.तीर्थस्नान करताना कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी मंदीर व्यवस्थापन व प्रशासनामार्फतही दक्षता घेण्यात आली होती.

देवस्वा-यांनी तीर्थस्नान करून व देवदर्शन घेवुन परतीचा प्रवास केला.सोमवारी सायंकाळपर्यंत भाविकांनी कुणकेश्वराचे दर्शन घेतले. तीन दिवस सुरू असलेल्या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतले तर कोट्यावधी रूपयांची उलाढाल झाली.
कुणकेश्वर येथे थाटण्यात आलेली व्यापा-यांच्या दुकानांमध्ये तिस-या दिवशीही मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली. यात्रा शांततेमध्ये सुरळीत पार पाडावी यासाठी पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक स्वयंसेवक काम करत होते.यावर्षी भाविकांना दर्शनाची व्यवस्था चांगल्याप्रकारे केल्याबद्दल भाविकांनी देवस्थान ट—स्टच्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.देवस्थान ट—स्ट,कुणकेश्वर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी यात्रेचे चांगल्या पध्दतीने नियोजन केल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!