कुडाळ (प्रतिनिधी) : नेरूर येथील श्री. देव कलेश्वर चा वार्षिक महाशिवरात्रोत्सव शनिवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला.
दरवर्षीप्रमाणे सालाबाद प्रमाणे यावर्षी पहाटे५ वाजता मानकरी व भडजींच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर लगेचच भाविकांना मंदिर खुले करण्यात आले. यावर्षी नेरूर येथील श्री. देव कलेश्वर चा रथोत्सव चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न करण्यात आला. यावेळी श्रींचे दर्शन घेण्यासाठी दीड ते दोन लाख भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी हजेरी लावली. राजकीय नेते सेलिब्रिटी हे देखील यावेळी उपस्थित होते. या संपूर्ण महाशिवरात्र उत्सवासाठी कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, कुडाळ पोलीस स्टेशन, महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, आरोग्य विभाग यांच्यावतीने महाशिवरात्र उत्सवास चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आले होते.
सर्व भाविकांनी, व्यापाऱ्यांनी या सर्वांच्या सहकार्या चे समाधान व कौतुक व्यक्त केले. देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती नेरूर यांच्या वतीने सर्व प्रशासनाचे आभार मानण्यात आले.