चौके वावळ्याचे भरड येथे जेष्ठचा सन्मान-महिलांना साडीवाटप

साईभक्त चारिटेबल फाउंडेशन ट्रस्ट मुंबईकडून सामाजिक उपक्रम

चौके (प्रतिनिधी) : मुंबई येथील साईभक्त चॅरिटेबल फाउंडेशन ट्रस्टच्या यांच्यावतीने चौके वावळ्याचे भरड येथील वावळ्याचे भरड भराडी कला क्रीडा विकास मंडळातील साठ वर्षावरील बेचाळीस जेष्ठ महिला पुरुष यांचा शाल व कानटोपी,चादर, वेगवेगळे ज्युस,औषधे आदी भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी साई भक्त चारिटेबल फाउंडेशन ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष विनोद भाऊ हळदणकर, शुभचिंतक सल्लागार सौ अनिताताई पाटोळे, ट्रस्ट चे सदस्य सुरेश मांडवकर,सिद्धेश राणे,आशिष राणे,वावळ्याचे भरड मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय गावडे उपाध्यक्ष मोहन गावडे, सचिव श्रीधर नाईक,जेष्ठ सदस्य हरिश्चन्द्र गावडे मंडळाचे माजी अध्यक्ष बिजेंद्र गावडे, ज्येष्ठ मार्गदर्शक परशुराम गावडे, यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी सभासद उपस्थित होते.

यावेळी या ट्रस्टचे अध्यक्ष विनोद भाऊ हळदणकर यांनी आपला हा उपक्रम सामाजिक भावनेतून आपण गावागावात ठिकठिकाणी दरवर्षी करत असतो. यावर्षी आमच्या ट्रस्टमधील सदस्य संजोग गावडे यांनी हा उपक्रम आपल्या गावी चौके येथे करण्यात यावा असे सांगितले. त्याप्रमाणे हा उपक्रम या ठिकाणी घेण्याचे ठरविले. गावातील या मंडळातील या ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले हेच आमचे भाग्य आहे. आम्हाला वडिलांसमान असणाऱ्या या वृद्ध आईबाबांची सेवा करता आली याचे समाधान मिळाले. यावेळी मुंबई चेंबूर येथील समाजसेविका सौ.अनिताताई पाटोळे यांनीही मुंबईवरून स्वखर्चाने आणलेल्या साड्याचे वाटप येथील महिला भगिनींना करण्यात आले.

पुढील वर्षी सुद्धा या ट्रस्टच्या मार्फत या गावातील या मंडळातील जेष्ठ नागरिक,महिला, शालेय मुले यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू उपलब्ध करून देण्यात येतील असे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.यावेळी वावळ्याचे भरड भराडी कला क्रीडा विकास मंडळाच्या वतीने बिजेंद्र गावडे व मोहन गावडे यानी ट्रस्टच्या दातृत्वाचे कौतुक करून साईभक्त ट्रस्ट मुंबई पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!