आंबोली (प्रतिनिधी) : आंबोली वनपरिक्षेत्रातील मौजे आंबोली हिरण्यकेशी अनिर्णित वनसर्व क्र.23 या वनविभागाच्या ताब्यात असलेल्या शासकीय वनजमिनीवर अतिक्रमण करून 14 बंगले, 4 चौथरे, 01 विहीर (सर्व चिरेबंदी बांधीव) असे अनधिकृत बांधकामाचे अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले होते. त्या प्रकरणी महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 कलम 53, 54 व 54(अ) अन्वये योग्य तो तपास पूर्ण करून मंगळवार दि. 05मार्च रोजी महसूल विभाग व वन विभाग यांच्या संयुक्त कारवाईने आंबोली हिरण्यकेशी अनिर्णित वनसर्वे क्र.23 मधील क्षेत्रात अतिक्रमण करून बांधकाम केलेले 14 बंगले, 4 चौथरे, 01 विहीर (सर्व चिरेबंदी बांधीव) व त्या क्षेत्रातील इतर साहीत्य जड यंत्राचे (JCB) साहयाचे काढून अतिक्रमण निष्कासन केले आहे. अतिक्रमण निष्कासन कामी झालेला खर्च संबधित अतिक्रमण करणारे यांचे नावावर महसूली अभिलेखी बोजा चढविणेत येणार असल्याचे संबधित विभागाने सांगितले आहे. या प्रकरणी पोलिस विभाग सावंतवाडी यांनी उपस्थित राहून अतिक्रमण निष्कासन करण्यास सहकार्य केले.













