“खासदार विनायक राऊत याना निवडणुकीत विजयी करत गद्दाराना त्यांची जागा दाखवून देणार” – सतीश गुरव

खारेपाटण (प्रतिनिधी) : येत्या लोकसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे विद्यामन खासदार विनायक राऊत यांनाच पुन्हा एकदा रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात येथील कडवे शिवसैनिक निवडून देणार व गद्दाराना त्यांची जागा दाखवून देणार अशी प्रतिक्रिया शिवसेना खारेपाटण जिल्हा परिषद संपर्क प्रमुख तथा कट्टर शिवसैनिक श्री सतीश गुरव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. शिवसेना शिंदे गटाचे कणकवली विधानसभा प्रवक्ते मंगेश गुरव यांनी नुकतीच आपल्या पक्षाच्या खारेपाटण येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन पुढील लोकसभेचे विजयी उमेदवार हे किरण उर्फ भैयाशेठ सामंत च असतील असे सांगत विद्यमान शिवसेना खासदार विनायक राऊत यांचेवर विकास कामाच्या संदर्भात टीका केली होती. या टीकेला प्रतिउत्तर म्हणून खारेपाटण शिवसेना विभाग संपर्क प्रमुख सतीश गुरव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात आमचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी गेल्या १० वर्षे मध्ये जे काम केले आहे.ते अजून कोणीही केलेले नसून मिंधे गटाचे पदाधिकारी मंगेश गुरव याना खासदार विनायक राऊत यांनी केलेले काम व मतदार संघात त्यांना मिळत असलेला वाढता पाठिंबा विरोधकांची चिंता वाढवणारा असून पराभवाचे सावट हे अगोदरच दिसत असल्यामुळे ते असे बोलत आहेत.यापुढे खासदार विनायक राऊत यांच्यावर बोलल्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल असे देखील सतीश गुरव यांनी सांगितले आहे.तर आम्ही सर्व शिवसैनिक येथील सामान्य जनता खासदार विनायक राउत यांचे सोबत असून लोकसभा निवडणुकीत खासदार विनायक राउत हेच उमेदवार म्हणून भरघोस मतांनी निवडून येतील असे देखील शेवटी सतीश गुरव यांनी सांगितले.

error: Content is protected !!