देवगड (प्रतिनिधी) : ८ मार्च जागतिक महिला दिन या दिनाचे औचित्य साधून गडदेवाडी( पुरळ हुर्शी) ग्रामस्थांमार्फत महिला दिनाचा कार्यक्रम ९ मार्च२०२४ रोजी शेतकरी वाचनालय येथे संपन्न झाला .
संज्योती ब्युटी पार्लरच्या संचालिका ज्योती पुरळकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. शिक्षणाबरोबरच एखादी कला शिकून घ्या असा मौलिक संदेश त्यांनी आपल्या भाषणातून उपस्थित महिलांना दिला. ब्युटी पार्लर व टेलरिंग व्यवसायातील आपले अनुभव त्यांनी अगदी नेमक्या शब्दात मांडून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमात सिद्धी रानडे ग्रंथपाल शेतकरी वाचनालय] व मानसी करंदीकर यांनी स्वरचित कविता सादर केल्या . निलेश तिर्लेाटकर व मृणाल करंदीकर यांनीही महिला दिन विशेष कविता सादर केल्या. अंजू काणे हिने महिला म्हणून आलेले अनुभव उत्तम रीतीने मांडले . पूजा राणे यांनी बचत गटाच्या माध्यमातून स्त्री सक्षमतेबद्दल फार सुंदर विचार मांडले. सुजाता करंदीकर यांनी आपल्या घरगुती लोणचे या व्यवसायाबद्दल चे अनुभव सर्वांसमोर मांडले रश्मी तिर्लोटकर हिन सुंदर सूत्रसंचालन केले .या कार्यक्रमाची संकल्पना संजीवनी फडके यांची होती याला विकास देवळेकर व सुरेश देवळेकर यांनी उत्तम साथ दिली त्यामुळे हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने साजरा झाला.












