कार्यशाळेच्या निमित्ताने जिल्हास्तरीय बाल चित्रकला स्पर्धा २०२३-२४ चे होणार पारितोषिक वितरण
कार्यशाळेस माध्यमिक शिक्षणाधिकारी रहाणार उपस्थित
वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कला अध्यापकांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन गुरुवार दिनांक १४ मार्च २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक पतपेढी ओरस येथे सकाळी दहा वाजता माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावेळी कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई व माध्यमिक शिक्षण विभाग सिंधुदुर्ग यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी यांच्या उपस्थितीत पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. *जिल्हास्तरीय बाल चित्रकला स्पर्धा*
गट क्रमांक 1
१.वैभवी प्रशांत नार्वेकर,उभा दंडा शाळा नंबर 3
२.रुद्रेश मोहन परब जि प प्राथमीक शाळा मुणगे नंबर एक
३.ओवी संतोष सुतार,विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली
गट क्रमांक 2
१.श्लोक समीर चांदरकर जि प केंद्रशाळा कट्टा नंबर एक
२.जि प प्राथमीक शाळा माडखोल नंबर दोन
३.मनस्वी प्रसाद सावंत, मिलागरीस मराठी प्राथमिक शाळा सावंतवाडी
गट क्रमांक 3
१.मोहित नीलकंठ सुतार विद्यामंदिर कणकवली
२.विद्या दत्तगुरु कांबळी,मळगाव इंग्लिश स्कूल
३.सुरेश सुहास सावंत, वराडकर स्कूल कट्टा
गट क्रमांक 4
१ श्रेया समीर चांदरकर वराडकर स्कूल कट्टा
२ प्रांजली विश्वास कदम शिरगाव हायस्कूल शिरगाव
३. आर्यन सुनील पवार विद्यामंदिर प्रशाला कणकवली
तरी यश संपादन केलेले विद्यार्थी आपल्या किंवा जवळच्या प्राथमिक किंवा माध्यमिक शाळांमध्ये असतील तर त्यांना दिनांक १४ मार्च च्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासंदर्भात सूचना द्याव्यात असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कला अध्यापक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.












