संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचा 5 मार्चला वर्धापनदिन सोहळा

राज्यस्तरीय पुस्कार वितरण व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा करण्यात येणार सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था, मुंबई-महाराष्ट्र या सेवाभावी संस्थेचा राज्यस्तरीय चतुर्थ वर्धापनदिन सोहळा २०२३, संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४५ वी जयंती आणि राज्यस्तरीय पुस्कार वितरण सोहळा २०२३ रविवार ५ मार्च २०२३ रोजी मराठा मंडळ हॉल, कणकवली येथे सकाळी १० वा. संस्थापक राज्याध्यक्ष संजय कदम यांच्या अध्यक्षेखाली संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स मुंबई मनोज हुमरसकर,युवा उद्योजक, संस्थापक ओंमकार बर्ड प्रुफिंग प्रा.लि. मुंबईचे संजय चव्हाण,पंचायत समिती, राधानगरी माजी उपसभापती रविश पाटील, गुंतवणूक सल्लागार- मुंबई अनिल चव्हाण,भागिरथी प्रतिष्ठान अध्यक्ष दिनेश भोईर, दै.रत्नागिरी टाईम्स चे आवृत्तीप्रमुख लक्ष्मीकांत भावे हे उपस्थित राहणार आहेत .

संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था, मुंबई महिलाध्यक्षा ॲड.हर्षा चौकेकर,राज्यसरचिटणीस प्रसाद मसुरकर,राज्यउपाध्यक्ष पंढरी जाधव,राज्यखजिनदार रविंद्र पावसकर,राज्यसंचालक, कोकण विभाग अध्यक्ष प्रा. भिकाजी नेरकर,जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग डॉ.प्रदिप बांबार्डेकर,महिला जिल्हाध्यक्षा सिंधुदुर्ग रश्मी कुडाळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.यावेळी सांगली येथील लेखक – कवी डॉ. रविंद्र श्रावस्ती यांचे व्याख्यान होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!