केसाने गळे कापणारे केसरकर, आता वंचितांचे चित्त भटकविण्यासाठी मगरीचे अश्रू गाळून सोंग गळे काढत आहेत – संदीप सरवणकर

वैभववाडी (प्रतिनिधी) : आपल्या पक्षासाठी इडी ची कोठडी ही प्रसंगी झेलणारे उद्धव साहेबाचे निष्ठावंत शिलेदार कोठे? आणि पाठीवर पान पडले , तरी आभाळ फाटले ,म्हणून कोकलनारे खोकेदार कोठे? यांची तुलना करता येणार नाही. परंतु आपले ठेवावे झाकून, दुसऱ्याचे पाहवे वाकून , ही काही, सवय काही नेत्यांची जात नाही, म्हणून आपला व मित्र पक्षात चाललेला “टिकटेचा शिमगा “, संपयाचे आधी , “कोकणचा विकास हा, राणे करू शकतात,” असे बोंब ही ते मारायला लागले आहे.त्यांचे हे म्हणणे खरे असेल तर ,त्यांनी आपल्या मंत्री पदाचे बत्तासे हे कोकणचे विकासासाठी नारायण राणे यांच्या ,विकास वारसांचे तोंडात भरवायला पाहिजे.पण , तसे ते कधीच करणार नाही. परंतु आपल्याला नको असलेली , खासदारकीची लढाई ते राणे यांच्या गळ्यात मारण्यात यशस्वी होतील ,असे आतातरी वाटते आहे. त्यासाठी त्यांनी शिर्डी ला जाताना, त्रॅम्बकेश्र्वर ला “नारायण “नाग “बळी” ही केला असण्याची शक्यता आहे . पण, ते आता संजय राऊत यांचे सोबत वंचित आघाडी शी बोलणी यशस्वी होऊ नये .यासाठी आसामच्या कामख्या देवीला कुठला बळी देणार आहेत? .हे माहीत नाही.पण , त्यांना वंचित महविकास आघाडीत येवू नये हे मनापासून वाटते असेच दिसते. त्याचसाठी ते बाळासाहेब आंबेडकरांसाठी नाकश्रू ही काढीत आहेत. त्यांची भावना खरी असेल तर त्यांनी आपली स्वतःची आमदारकीची सावंतवाडीची जागा वंचीताना खाली करून द्यावी?. पण , हेही ते कधीच करणार नाही. फक्त कामाचा सपाठा लावणारे विनायक राऊत याचा विजय कसा ते पचवू शकतात, हे आता फक्त बघायचं राहिले आहे.

error: Content is protected !!