युवासेना खासदारकी च्या विजयाची पताका फडकवण्यासाठी सज्ज

खासदार विनायक राऊत यांनी फुंकले रणशिंग

कुडाळ (अमोल गोसावी) : युवासेना विजयाची पताका फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे. युवाशक्तीची ताकद आज देशातील लोकशाही वाचवण्यासाठी सज्ज झालेली या मेळाव्यातून दिसत आहे. आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी खोक्याच्या मागे गेले नाहीत म्हणून मोदी सरकारचे बोके त्यांच्या मागे लागले आहेत. एसीबी ला दोघेही पुरून उरले आहेत. ह्या बोक्याना ठोकून निष्ठवंताचा सन्मान करण्याची ही निवडणूक आहे . विरोधी उमेदवाराचा पराभव निश्चित आहे. ज्याला पराभूत व्हायचे आहे त्याने महायुती ची उमेदवारी घ्यावीअसे आव्हान लोकसभेचे महाआघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांनी केले. आज देशात संविधान, घटना धोक्यात आली आहे. भाजपा घटना बदलून संविधान धोक्यात आणत आहे.दिल्लीतील केजरीवाल यांचे सरकारचे अधिकार धोक्यात आणण्याचा डाव मोदी सरकारने आखला होता. हा डाव सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडला. स्वामिनाथन आयोग माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी अंमलात आणला. त्यातून देशातील शेतकऱ्यांचे भले झाले आहे. राज्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना धीर देण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. 50 खोक्याच्या आमिषाला बळी पडून आमदार आणि 75 खोक्याना बळी पडलो असतो तर नरकात गेलो असतो. ज्या शिवसेनेने आम्हाला नाव दिले त्या पक्षाशी बेईमानी करणे म्हणजे नरकात जाणे आहे.होय आम्ही रिफायनरी ला आम्ही विरोध केला. कारण रिफायनरी रोजगार देणारी नसून कोकण उध्वस्त करणारी आहे.रिफायनरी ही जमीन दलालांसाठी असून भूमीपुत्रांसाठी नाही. रिफायनरी तुन लाखो नोकऱ्या देण्याचे म्हणता तर घ्या फॉर्म भरून आणि करा पगार सुरू असे आव्हान राऊत यांनी दिले. सिडको च्या ताब्यात कोकण च्या जमिनी देऊन गाव ताब्यात घेऊन जमिनीवर रिझर्व्हेशन टाकून त्या जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालण्याचे काम सरकार करत आहे. त्याला मी विरोध केला असून यापुढेही करणार असे राऊत यांनी ठणकावून सांगितले. कोकणात भले मोठे प्रोजेक्ट केंद्र सरकारने दिले नाही तरी प्रोसेसिंग युनिट दिले तरी इथे रोजगार मिळेल असेही राऊत म्हणाले.

error: Content is protected !!