आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने भाजपा दिव्यांग विकास आघाडीची बैठक संपन्न !

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : आज दि. २८/०३/२०२४ रोजी भाजपा जिल्हा कार्यालय,ओरोस वसंतस्मृती येथे भाजपा दिव्यांग आघाडीची बैठक संपन्न झाली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने दिव्यांग आघाडीने प्रचार करताना लाभार्थी पर्यंत पोहोचून मोदी सरकार व शिंदे – फडणवीस सरकार ने दिव्यांगांसाठी दिलेल्या योजनांची माहीती द्यावी, असे मार्गदर्शन केले.

यावेळी दिव्यांग विकास आघाडी जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी लोकसभा निवडणूक प्रचारात सक्रिय सहभाग घेऊन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार विजयी करण्यासाठी खारीचा वाटा उचलु असे अभिवचन दिले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना (बाळू) देसाई, दिव्यांग आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा सहसंयोजक प्रकाश वाघ, वैद्यकीय प्रभारी आरती बापट, कणकवली प्रभारी प्रशांत सावंत, शासकीय योजना प्रभारी तुळशीदास कासवकर, क्रीडा प्रभारी प्रशांत कदम, कुडाळ प्रभारी आश्विनी पालव, ५% अनुदान प्रभारी रमेश जाधव, कुडाळ तालुका संयोजक सुधीर चव्हाण, अनिल पालव इत्यादी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!