खारेपाटण (प्रतिनिधी) : बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य असलेल्या एस टी महामंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा रा.प. महामंडळच्या वतीने मुंबई सेंट्रल डेपोला दिवसा जाणारी एक मात्र मालवण डेपोची कायमस्वरूपी मालवण – मबई सेंट्रल ही एस टी बस असून या एस टी बस वर बरेचसे प्रवासी अवलंबून असून सद्या गेला महिनाभर ही बस खारेपाटण एस टी बस स्थानकात न येता परस्पर मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरून जात असल्याने प्रवासी वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की,मालवण – मुंबई ही एस टी बस खारेपाटण एस टी बस स्थानकात सकाळी १०.०० वाजताच्या सुमारास येते.तर सदर एस टी मुंबई वरून खारेपाटण एस टी बस स्थानक येथे दुपारी २.०० च्या दरम्यान येते.आजपर्यंत या एस टी बसच्या सेवे मध्ये कधीच खंड पडलेला नाही. खारेपाटण दशक्रोषितील नागरिक तथा प्रवासी वर्गाला सदर एस टी बस मुंबईला जाण्याकरिता सोयीची व फायद्याची ठरत होती. मात्र सदर एस टी बस चे रूपांतर हे शिवशाही एस टी बस मध्ये केल्यापासून मालवण – मुंबई ही एस टी बस खारेपाटण एस टी बस स्थानकात न येता परस्पर मुंबई – गोवा राष्ट्रीय महामर्गांवरून खारेपाटण वरचे स्टँड येथून मुंबईला जात असल्याने प्रवासी वर्गामध्ये तीव्र नाराजी पसरली असून परिणामी खारेपाटण एस टी बसस्थानकात सकाळच्या सत्रात आजही प्रवासी वर्ग या एस टी गाडीची वाट उभे असलेले दिसतात.
दरम्यान खारेपाटण एस टी बस स्थानक वाहतूक नियंत्रक प्रमुख श्री चव्हाण याना याबाबत विचारले असता आपण आपल्या वरिष्ठ अधिकारी वर्गाना याबाबत माहिती दिली असून मालवण – मुंबई एस टी गाडी खारेपाटण एस टी बस स्थानकात येणे गरजेचे असलेचे कळवले असल्याचे श्री चव्हाण यांनी सांगितले.
परिणामी या एस टी गाडी वर अवलंबून असलेले प्रवासी खाजगी वाहने व रेल्वे प्रवसाकडे झुकले जात आहेत.याला एस टी महामंडळच जबाबदार असून जिथे प्रवशाना एस टी ची गरज आहे. तेथे एस टी बस देणे आत्यावश्यक आहे. तरी सदर एस टी गाडी पूर्ववत होती अशीच सुरु ठेवण्यात यावी व अशी खारेपाटण एस टी बस स्थानकात येऊन प्रवासी घेऊन पुढे मार्गस्थ करावी. अशी जोरदार मागणी खारेपाटण दशक्रोशितिल नागरिकांकडून तथा प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे.