भीमराव पांचाळेंच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली कणकवलीत गझल गायन व लेखन मार्गदर्शक कार्यशाळा

कणकवली (प्रतिनिधी) : मराठी गझलच्या प्रचार – प्रसाराचे कार्य करणाऱ्या गझल सागर प्रतिष्ठान, मुंबई आणि अखंड लोकमंच कणकवली यांचे संयुक्त विद्यमाने गझल लेखन व गझल गायन मार्गदर्शक कार्यशाळा नगर वाचनालय, कणकवली येथे शनिवार दिनांक १८ मे, २०२४ रोजी सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत आयोजित करण्यात आलेली आहे.

गझल नवाज भीमराव पांचाळे हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करतील. गझल लेखनाच्या आकृतीबंधाबद्दल प्राथमिक स्वरूपाचे धडे देण्यात येतील. ज्येष्ठ गझलकार देविदास पाटील, रत्नागिरी हे देखील कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून हजर राहतील.

गझलची वैशिष्ठ्यपूर्ण आशय प्रधान गायकी सोदाहरण, प्रत्यक्ष गायकीतून भीमराव पांचाळे उलगडून दाखवतील.

कणकवली आणि परिसरातील गझल लेखन आणि गायनामध्ये रुची असणाऱ्या इच्छुकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा आणि कार्यशाळेत सहभागी व्हावे.

सकाळचा नाश्ता , दुपारचे भोजन आणि सायंकाळच्या चहा बिस्किटाची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात येईल.
कार्यशाळेसाठी नाममात्र शुल्क ₹ २०० केवळ आकारण्यात येईल.

सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे
शैलजा कदम-8805292596 , तसेच विनायक सापळे-9404940217 यांचेकडे नोंदवावित असे आवाहन आयोजकांतर्फे नामानंद मोडक (अध्यक्ष- अखंड लोकमंच सिंधुदुर्ग ) यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!