ओझरम मध्ये शांततेत व उत्साह पूर्ण वातावरणात मतदान संपन्न…!

847 पैकी 514 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

तळेरे (स्वप्निल तांबे) : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी सात वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला. मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज होते.

कणकवली तालुक्यातील ओझरम गावात शांततेत मतदान सकाळपासून सुरु होते. बूथ वर प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. संध्याकाळी 6 वाजे पर्यंत 261 पुरुषांनी तर 253 महिलांनी मतदान केले. एकूण 847 मतदारांपैकी 514 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

error: Content is protected !!