86 वर्षीय वृद्धेने व्हील चेअरवर जाऊन बजावला मतदानाचा हक्क

कुडाळ (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूकीसाठी पणदूर गावातील 86 वर्षीय वृद्ध प्रभावती शत्रुघ्न गोसावी यांनी व्हील चेअरवर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील पणदूर गावातील 86 वर्षीय वृद्धा प्रभावती यांनी आज गावातील मतदानकेंद्रावर जाऊन आपले मतदान केले. वयोवृद्ध असलेल्या प्रभावती यांनी वयाच्या 86 व्या वर्षी मतदान करत सर्वच मतदारांसमोर मतदान हे आपले कर्तव्य असल्याचा परिपाठच घालून दिला आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पणदूर मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी उपस्थित राहत प्रभावती गोसावी याना मतदान करण्यासाठी आवश्यक सहकार्य केले.

error: Content is protected !!