वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरासह तालुक्यात विजवीतरण चा सावळा गोंधळ सुरू असून आज दुपारी 3 वाजल्यापासून वीज गायब झाली आहे. वीज ग्राहकांकडून वाढलेल्या दराने वीजबिल वसुली करूनही वीजपुरवठा सुरळीत न करणाऱ्या विजवीतरण लाच शॉक ट्रीटमेंट देणार असल्याचा इशारा वैभववाडी माजी पं स सभापती अरविंद रावराणे यांनी दिला आहे. आज दिवसभरात कुठेही पाऊस अथवा अन्य आपत्ती नसतानाही विजवीतरण ने वैभववाडी शहरासह तालुक्यात दुपारी 3 वाजल्यापासून बहुतांश ठिकाणी वीजपुरवठा खंडित केला. ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शहरासह गावातील पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. उन्हाळ्याने जनता हैराण झाली असतानाच विजवीतरण अधिकारी खंडित विजपुरवठा सुरळीत करण्यात अपयशी ठरत आहेत. भरमसाठ दराने वीजबिल वसुली करताना सेवा देण्याकडे विजवीतरण अधिकारी, कर्मचारी मात्र दुर्लक्ष करत आहेत. यात सुधारणा झाली नाही तर विजवीतरण लाच शॉक ट्रीटमेंट द्यावी लागेल असा इशारा माजी सभापती अरविंद रावराणे यांनी दिला आहे.