कणकवली शहरात प्लास्टिक वापराबद्दल 6 दुकानांवर कारवाई

मुख्याधिकारी कंकाळ यांची धडक कारवाई ; 21 हजारांचा दंड वसूल

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदी पथकाद्वारे कणकवली शहरात दिनांक 17 मे रोजी रोजी सिंगल युज प्लास्टिक व सबंधित वस्तू बाळगणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.सुमारे 6 आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करून रक्कम रु 21,900/- वसूल करण्यात आले. ह्या पथकामध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता सोनाली खैरे ,स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, ध्वजा उचले, शहर समन्वयक वर्षा कांबळे, आरोग्य लिपिक सतिश कांबळे, प्रविण गायकवाड, रविंद्र म्हाडेश्वर, सचिन तांबे, संजय राणे, राजेश राणे, विनोद जाधव व इतर नगरपंचायतीचे कर्मचारी ह्यांच्या द्वारे प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्यात आली. यावेळी 25 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.यावेळी शहरातील व्यापारी वर्ग व नागरिकांना कापडी पिशवीचा जास्तीत जास्त वापर करून पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!