फाेंडाघाट (प्रतिनिधी) : ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ, फोंडाघाट संचालित कै. राजाराम मराठे उच्च माध्यमिक विद्यालय (विज्ञान शाखा), फोंडाघाट या विद्यालयाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २०२४ चा निकाल १००% लागला आहे. या परीक्षेसाठी एकूण ४६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यापैकी २१ विद्यार्थी विशेष श्रेणी व २५ विद्यार्थी प्रथम श्रेणीमधून उत्तीर्ण झाले आहेत. यात प्रथम क्रमांक विभागून कु. आशिष मंगेश पाटील (४९०) ८१.६७%, व कु.हर्षली नंदकिशोर देवलकर (४९०) ८१.६७%, द्वितीय क्रमांक कु. सापळे स्वरा अजित (४६१) ८०.१७% व तृतीय क्रमांक कु. माधुरी अनिल राणे (४७९) ७९.८३% मिळवत उत्तीर्ण झाले. या वर्षी नव्याने चालू झालेल्या माहिती तंत्रज्ञान (IT) या विषयात सर्व ३६ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
२००९ मध्ये स्थापन झालेल्या या विद्यालयाचा निकाल सातत्याने १००% लागत असून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी विज्ञान शाखेत शिक्षण घेऊन उत्तीर्ण होत आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थाध्यक्ष मा.श्री. दिपेश नामदेव मराठे, सर्व संस्था पदाधिकारी तसेच प्राचार्य श्री. जयराज राऊळ, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.












