मुद्दाम नसेल ही, पण ऊद्दाम नक्कीच – संदीप सरवणकर

वैभववाडी (प्रतिनिधी) : मुंबईतील निवडणुकातील मतदान प्रक्रिया संपल्या, पण त्या गाजल्या ,अक्षम EVM मशीनने दिरंगाई पणा मुळे , त्यांनी मतदारानच दिलेल्या त्रासामुळे आणि त्या नंतर विरोधक व सत्ताधाऱ्यांनी एकमेकावर केलेल्या आरोपा मुळे. खरतर, EVM मशीन हा वेगळ्या अर्थाने वादाचा व प्रचाराचा म्हणण्यापेक्षा विरोधकांकडून अपप्रचाराचा मुद्दा सुरवातीपासून घेतला गेला होता. त्या बाबतीत सत्ताधारी यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक होते . पण, नागरिक सर्वत्र EVM मशीन चे सदोष असणे बाबत आरोप करीत होते. तेव्हा प्रशासन कर्ते उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधक असलेले उद्दव ठाकरे यांनी उठवलेल्या प्रश्नावर माफी न मागता, साधे नीट उत्तर ही देवू शकले नाही. उलट ,”हे पराभव दिसू लागल्याने ,उद्धव ठाकरे रडगाण गात आहे “.असे उद्दाम पणे उत्तर देताना टीव्ही वर दिसत होते .आता अश्या असंवेधनशिल सरकारला आता एकच प्रश्न विचारायचा आहे,” काय चाललय..आता चाललय तरी काय?’

error: Content is protected !!