कु. मृण्मयी भावे प्रथम, कु. सुरभी बापट द्वितीय तर कु. वरून राणे तृतीय
आचरा (विवेक परब) : देवगड तालुक्यातील एस .बी .राणे हायस्कूल नारिंग्रे या प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून कु. मृण्मयी राजकुमार भावे हिने 93.80% मिळून प्रथम क्रमांक, कु. सुरभी सुनील बापट हिने 85 % मिळवून द्वितीय क्रमांक, तर वरून आशिष राणे याने 83.20% मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. सात विद्यार्थी विशेष प्राविण्याने, 12 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, सात विद्यार्थी द्वितीय श्रेणी व दोन विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत असे 24 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकालाची परंपरा राखली आहे. शिक्षण संस्थेचे सचिव व्ही. डी .राणे व संस्था संचालक आर. बी राणे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापकांचे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

प्रथम क्रमांक – मृण्मयी भावे

द्वितीय क्रमांक – सुरभी बापट

तृतीय क्रमांक – वरूण राणे












