‘मला सरकारमधून मोकळं करा!’ लोकसभेतील पराभवानंतर फडणवीसांचे राजीनाम्याचे संकेत

ब्युरो न्यूज (मुंबई) : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये ‘मला सरकारमधून मोकळं करा’ अशी मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश मिळाल्यानंतर फडणवीसांनी केलेल्या या विधानामुळे महाराष्ट्रात राजकीय भूंकप होणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.

“जागा कमी आल्यात हा फॅक्ट आहे. या निवडणुकीचं नेतृत्व भाजपामध्ये मी करत आहे. जो पराभव झाला, ज्या जागा कमी झाल्या त्याची जबाबदारी माझी आहे. मी हे मान्य करतो की मी कुठेतरी यामध्ये स्वत: कमी पडलो आहे. मी ती कमतरता भरुन काढण्याचा प्रयत्न करणार. भाजपाला महाराष्ट्रात जो काही सेटबॅक सहन करावा लागला त्याची सगळी जबाबदारी मी स्वीकारत आहे,” असं फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले. “मी भाजपाकडे अजून विनंती पक्षाकडे करणार आहे. भाजपामध्ये सगळे निर्णय पक्षच करतो. मला विधानसभेकरता पूर्णवेळ उतरायचं आहे. मी आघाडीच्या नेतृत्वाला विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं. ज्यामुळे मला पक्षासाठी काम करता येईल,. ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मला माझा पूर्ण वेळ देता येईल,” असं फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले.

“अर्थात मी सरकारच्या बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये आम्हाला जे काही करायचं आहे ते आम्ही करणार आहोतच. त्या टीमसोबत मी असेन. यासंदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे. त्यानंतर त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगितील त्यानुसार मी पुढची कारवाई करेन,” असंही फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!