दोडामार्ग पोलिसांकडून गोवा बनावटीची 14 हजार 400 रुपयांची दारू जप्त

दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग पोलिसांनी गोवा बनावटीची 14 हजार 400 रुपयांची अवैध दारू 4 जून रोजी आवाडे येथे जप्त केली. दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.हवालदार वसंत देसाई यांच्या फिर्यादीनुसार आरोपी डेव्हिड आलेक्स फर्नांडिस ( वय 58, रा. आवाडे, ता दोडामार्ग ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, 4 जून रोजी रात्री 8 वाजुन 33 मिनीट या वेळेस आरोपी डेव्हिड याच्या ताब्यात 14 हजार 400 रुपयांची गोवा बनावटीची अवैध दारू आढळून आली. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सदर अवैध दारू डेव्हिड याने आपल्या ताब्यात बाळगल्याच्या गुन्ह्यात त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ( ई ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!