नारायण राणेंच्या अभिनंदनाचा शिंदे शिवसेना गटाचा बॅनर फाडला ; भाजपा – शिंदे शिवसेनेतील दुफळी उघड

बॅनर वरील किरण सामंत आणि संजय आग्रे यांचा फोटो फाडला

कणकवली (प्रतिनिधी) : महायुतीचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच्या अभिनंदनचा बॅनर फाडण्यात आल्याचे चित्र आज कणकवलीत दिसून आले. कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौक मराठा मंडळ रोडवर हा बॅनर लावण्यात आला होता. या बॅनर वर नवनिर्वाचित उमेदवार नारायण राणे यांच्या मोठ्या फोटोसहीत अभिनंदन करणारे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू व लोकसभेसाठी इच्छुक असलेले किरण सामंत व जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांचे फोटो असलेला भाग फाडण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेची कणकवली दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.

error: Content is protected !!