स्मार्ट टेक्नॉलॉजीच्या युगात स्मार्ट व्यक्तिमत्व बनवा – जयेंद्र रावराणे
गणेश जाधव यांनी व्याख्यानातून उलगडले छत्रपती शिवरायांचे व्यक्तिमत्व
वैभववाडी (प्रतिनिधी) : आज सर्वत्र छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात संपन्न होत असताना. वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल आणि कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात राज्याभिषेक सोहळ्याचे निमित्त साधून वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या संकल्पनेतून प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन आयोजित केले होते. अध्यक्षीय भाषणात रावराणे यांनी उपस्थित शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाला मोलाचे मार्गदर्शन केले. स्मार्ट टेक्नॉलॉजीच्या युगात प्रत्येकाने आपापल्या विषयात स्मार्ट बनले पाहिजे आपले व्यक्तिमत्व विचार स्मार्ट असावे असे मत कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी व्यक्त केले. आनंदीबाई रावराणे सिनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ.काकडे सर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. शालेय जिवनात विद्यार्थी व शिक्षक यांचे व्यक्तिमत्त्व कसे असावेत याबाबत कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते गणेश जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व, व्यक्तिमत्वाचे विशेष, शिवरायांचे व्यक्तिमत्व घडविणारे प्रसंग, व्यक्ती याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाला अखंड विश्वामध्ये तोड नाही असे मत यावेळी त्यांनी मांडले. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज की जय..! जय भवानी.. जय शिवाजी..! अशा घोषणा देत. सभागृहात चैतन्य निर्माण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख विजय मरळकर, प्रास्ताविक संचालक शरद नारकर व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक बी.एस.नादकर यांनी केले.
या कार्यक्रमाला वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, संचालक शरद नारकर, विजय रावराणे, शांताराम देसाई, आनंदीबाई रावराणे सिनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे, प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर, प्रमुख वक्ते गणेश जाधव, उद्योजक विजय चौगुले, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष स्वराली कोलते, सांस्कृतिक प्रमुख विजय मरळकर व प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














