वराड प्रीमियर लीग मार्फत वराड हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आर्थिक मदत

चौके (अमोल गोसावी) : वराड प्रीमियर लीगच्या वतीने सौ. हि. भा. वरसकर विद्यामंदिर वराडमधील ५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच आर्थिक मदत देण्यात आली. फक्त खेळ आणि मनोरंजन हाच उद्देश नजरेसमोर न ठेवता सामाजिक बांधीलकी म्हणून दरवर्षी वराड प्रीमियर लीग च्या माध्यमातून गावात शैक्षणिक , सामाजिक , आरोग्यविषयक , मदत व समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात .

आज वराड हायस्कूल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात वराड प्रिमियर लीगचे व्यवस्थापक मंडळ श्री. जगन उर्फ सागर चव्हाण , श्री. समीर रावले, ॲड. प्रदिप मिठबांवकर , डॉ. प्रथमेश वालावलकर , श्री. जगदीश परब व श्रीकांत चव्हाण , प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापिका , सौ मयेकर मॅडम, श्री. मुळीक सर , श्री. परब सर , श्री गोसावी सर व इतर सहशिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापिका सौ. मयेकर मॅडम यांनी प्रशालेच्या वतीने वराड प्रिमियर लीगचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!