कृषिदूतांनी शेतकऱ्यांना सांगितले माती परिक्षणाचे महत्त्व

वैभववाडी (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न उद्यानविद्या महाविद्यालय सांगुळवाडी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत माती परीक्षण प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते. शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणासंबंधी जागृती होण्यासाठी हे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

या उपक्रमांतर्गत कृषिदुतांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन माती परीक्षणासाठी नमुना घेण्याची पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे दाखविली. जमिनीची सुपीकता जपण्यासाठी माती परीक्षण करणे आवश्यक आहे. माती परिक्षणामुळे रासायनिक खतांचे योग्य नियोजन करणे शक्य होते, तसेच जमिनीचे आरोग्य राखले जात असल्याचे कृषिदुतांनी सांगितले. यावेळी कृषिदुत महेश भिसे, ऋतुराज थोरात, महेश भिसे, गणेश जाधव, नागेश शिर्के, प्रथमेश कोळेकर, अभिजित इंगळे, ऋषिकेश शिंगटे यांनी या प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते. या प्रात्यक्षिकाल गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना उपक्रमासाठी उद्यानविद्या महाविद्यालयाच्या प्राचार्या ए.आर.कामतेकर, कार्यक्रम समन्वयक प्रा.पी.एस. सावंत, प्रा.फुटाणकर आणि प्रा .कणसे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

error: Content is protected !!