चौके (अमोल गोसावी) : ” जो अभ्यास कराल तो मन लावून करा,चांगला अभ्यास करून चांगले गुण मिळवा आणि पुढे जाऊन मोठे यश संपादन करा. ज्या शाळेत शिकून जाल त्या शाळेला आणि शिक्षकांना कधी विसरू नका, स्वतःची, घराची व परिसराची स्वच्छता राखा. ” असे प्रतिपादन मालवण कुंभारमाठ येथील रहिवासी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड असेट मॅनेजमेंट कंपनीचे ॲडमीन आणि आय टी हेड दिपेश गोसावी यांनी पूर्ण प्राथमिक शाळा कुंभारमाठ शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
दिपेश गोसावी यांनी पू. प्रा. शाळा कुंभारमाठ , पू. प्राथमिक केंद्रशाळा आंबेरी, प्रा. शाळा काळसे नं. १, आणि प्रा. शाळा काळसे धामापूर या चार शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि पेन यांचे वाटप केले यावेळी कुंभारमाठ येथे दिपेश गोसावी, शुभम गोसावी, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दिक्षित, केंद्रप्रमुख नंदकिशोर गोसावी, मुख्याध्यापक प्रमोद गोसावी, सहाय्यक शिक्षीका कविता खानोलकर, स्मिता जाधव आणि विद्यार्थी उपस्थित होते, तर आंबेरी केंद्रशाळेत मुख्याध्यापक धानजी चव्हाण, सहाय्यक शिक्षक भागवत अवचार, गायत्री गिरकर, काळसे येथे सुकन्या गंगावणे, माधुरी फुंडे आणि विद्यार्थी उपस्थित होते.