चिंदर भटवाडी तलाठी सजा “कोतवाल” कायम स्वरूपी मिळावा

नियुक्ती होऊन सहा महिने झाले तरी कोतवाल कामावर हजर नाही

ग्रामसभेत ग्रामस्थांची नाराजी सर्वांनुंमते ठराव

रजेवर असलेल्या कोतवालाची नियुक्त रद्द करून गावातील स्थानिकांन मधून कोतवाल नियुक्त करावा

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर भटवाडी सजा कोतवाल पदाची नियुक्ती होऊनही गेले सहा महिने सदर कोतवाल हजर झालेला नाही. चिंदर गावातील सर्वसामान्य नागरीकांची परवड होत असून वारंवार वरिष्ठाकडे पाठपुरावा करूनही सदर कोतवाल अजून पर्यंत हजर झालेला नाही.

चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात (10 जुलै रोजी) घेण्यात आलेल्या तहकूब ग्रामसभेत आयत्या वेळी येणाऱ्या विषयात ग्रामस्थांनी कोतवाल विषयी नाराजी व्यक्त करीत, चिंदर भटवाडी तलाठी सजा इथे नियुक्त करण्यात आलेला कोतवाल सहा महिने होऊन गेलें तरी अजून हजर झालेला नसून सदर नियुक्त रद्द करून नवीन भरती करून गावातील स्थानिकांन मधून कोतवाल नियुक्त करावा असा ठराव घेतला. तसेच ग्रामपंचायतीने संबंधित खात्याकडे ठराव पाठून त्याचा पाठपुरावा करावा असे ही ग्रामसभेत ठरले.

यावेळी ग्रामसभाध्यक्ष सरपंच नम्रता महंकाळ, उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामविकास अधिकारी मंगेश साळसकर, ग्रामपंचायत सदस्य केदार(पप्पू)परुळेकर, महेंद्र मांजरेकर, शशिकांत नाटेकर, माजी सरपंच तथा भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तंटामुक्त अध्यक्ष संतोष गावकर, मनोज हडकर, विश्वास खरात, भानुदास मेस्री, चंद्रसेन पारकर, दिगंबर जाधव, प्रमोद सुर्वे ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!