चौके (अमोल गोसावी) : आषाढी एकादशी म्हटली कि समोर साक्षात पांडुरंग अवतरीत होतो. चराचरात सामावलेल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी सारी सृष्टी आतुरलेली आहे. जळी,स्थळी,पाषाणी पांडुरंगच दिसत आहे.
पांडुरंगाचे हे निर्गुण निराकार रूप मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल आणि जुनिअर कॉलेजची विद्यार्थीनी कुमारी श्रेया समीर चांदरकर हीने एका छोट्याशा दगडावर ऍक्रेलिक रंगाच्या सहाय्याने साकारले आहे. हे चित्र साकारण्यासाठी तिला दोन तासांचा कालावधी लागला. श्रेया वराडकर स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे इयत्ता दहावी मध्ये शिकत आहे.यापूर्वी विविध रंगीत दोऱ्यानं पासून राजमाता जिजाऊ, भगवान गौतम बुद्ध, पट्टचित्र शैलीत प्रभू श्रीराम साकारले आहेत. तसेच दोऱ्यांपासून तयार केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कलाकृतीला जगभरातून कौतुकाची थाप मिळाली होती. श्रेया हिने अनेक स्पर्धा मध्ये भाग घेत बक्षिसे प्राप्त केले असून ती सिंधुदुर्गातील प्रसिद्ध रांगोळीकार तथा कला शिक्षक समिर चांदरकर यांची कन्या आहे.











