खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नुकतेच प्राप्ती कट्टी यांची तर उपाध्यक्षपदी प्रियंका गुरव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. जिल्हा परिषद केंद्र शाळा खारेपाटण नं.१ ची पालक सभा केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच शाळेच्या सभगृहात संपन्न झाली.यावेळी शैशाणिक वर्ष सन २०२४-२५ ते २०२५-२६ या पुढील २ वर्षांकरिता शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली. नवीन निवडण्यात आलेली समिती पुढील प्रमाणे
अध्यक्ष – प्राप्ती राजू कट्टी, उपाध्यक्ष – प्रियंका स्वप्नील गुरव, सदस्य – संतोष यशवंत पाटणकर,उमेश धोंडू गुरव, दीक्षा दिनेश पाटणकर, नीलम नीलेश गुरव, पुर्वा प्रसाद गाठे, प्रांजली प्रसन्नकुमार बाबरदेसाई, निधी निशिकांत शिंदे, मिथुन मनोज शेंगाळे, यासीन आब्बास रमदुल, स्थानिक प्राधिकरण सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य – गुरुप्रसाद दीपक शिंदे,शिक्षण तज्ञ – मनोज लक्ष्मण करंदीकर, शालेय विद्यार्थी प्रतिनिधी सर्वेश रवींद्र नाडगौडा, रिया राजू कट्टी तर या समितीच्या सचिव पदी केंद्र शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप दत्ताराम श्रावणकर यांची पदसिद्ध म्हणून निवड करण्यात आली.
या पालक सभेला ग्रामपंचायत सदस्य शितिजा धुमाळे, अस्ताली पवार, खारेपाटण पोलीस स्टेशन बिट अंमलदार उद्धव साबळे यांसह शाळेचे पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन करून उपस्थित सर्वांचे आभार मानले.