जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या माता पालक संघाच्या उपाध्यक्षपदी संध्या पोरे तर पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी मंगेश ब्रम्हदंडे यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ ची पालक सभा नुकतीच शाळेच्या सभागृहात शाळेचे मुख्यद्यपक प्रदीप श्रावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. सदर सभेत सन – २०२४-२५ या शैशनिक वर्षांकरिता शालेय समिती गठीत करण्यात आल्या यामध्ये शाळेच्या माता पालक संघाच्या उपाध्यक्षपदी संध्या हर्षल पोरे यांची तर पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी मंगेश वसंत ब्रम्हदंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच या दोन्ही समित्यांच्या पदसिध्द अध्यक्षपदी शाळेचे उच्च श्रेणी मुख्यद्यापक प्रदीप श्रावणकर यांची निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

या पालक सभेला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्राप्ती कट्टी,माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, ग्रामपंचायत सदस्य गुरुप्रसाद शिंदे, अस्ताली पवार, शितीजा धुमाळे, खारेपाटण पोलीस स्टेशन बीट अंमलदार उद्धव साबळे आदी मान्यवर उपस्थित होते. खारेपाटण केंद्र शाळेची नव्याने निवडण्यात आलेली माता पालक समिती पुढील प्रमाणे – उपाध्यक्ष – संध्या हर्षल पोरे, सदस्य – शीतल शशिकांत इंगळे, दिपाली अजित धुमाळे, सारिका आनंद चौरे, प्राची प्रकाश नानिवडेकर, वृषाली रवींद्र नाडगौडा, अस्ताली प्रियाल पवार, सुवर्णा सुरेश कोळसुलकर, ईशानी विशाल कोर्लेकर, सेजल संजय साटवीलकर, अरुणा नीलेश ब्रम्हदंडे, आश्र्विनी ज्योतिबा पाटील, तर या समितीच्या सचिवपदी शाळेच्या शिक्षिका आरती जोजन तसेच शाळेची नव्याने निवडण्यात आलेल्या पालक शिक्षक संघाची समिती पुढील प्रमाणे – उपाध्यक्ष – मंगेश वसंत ब्रम्हदंडे, संदीप मधुकर पाटणकर, दिनेश दत्ताराम कानडे, कीर्ती मनोज जाधव, गिरीश भिकाजी मोरे, शीतिजा गिरीश धुमाळे, नीलेश तुकाराम करांडे, वैशाली शिवाजी पाटील, संदेश मधुकर पाटणकर, भाग्यश्री भालचंद्र सुतार,सुरेंद्र रमेश धामापूरकर तर या समितीच्या सचिव पदी शाळेचे पदवीधर शिक्षक मिलिंद सरकटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नव्याने निवडण्यात आलेल्या दोन्ही समितीच्या नाव निर्वाचित पदाधिकारी यांचे शाळेच्या पालकांच्या वतीने अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!